AnnachePastry

आलमंड पीच टार्ट

क्रस्टसाठी

  • मैदा
    वजन:२१० ग्रॅम
    प्रमाण:1 2/3 कप
  • पिठीसाखर
    वजन:८५ ग्रॅम
    प्रमाण:3/4 कप
  • बदामाची पूड (Almond flour)
    वजन:२५ ग्रॅम
    प्रमाण:1/4 कप
  • मीठ
    वजन:३ ग्रॅम
    प्रमाण:1/2 लहान चमचे
  • थंड बटर
    वजन:१२५ ग्रॅम
    प्रमाण:1/2 कप
  • अंडं
    वजन:५० ग्रॅम
    प्रमाण:1 नग

कृती

  1. क्रस्ट तयार करणे

    एका मोठ्या बाऊलमध्ये 210 g चाळलेला मैदा, 85 g पिठीसाखर, 25 g बदामाची पूड आणि ½ tsp मीठ एकत्र करा. त्यात 125 g थंड बटरचे लहान तुकडे घाला आणि मिश्रण ब्रेडक्रंबसारखे होईपर्यंत हलक्या हाताने चोळा.

    दुसऱ्या बाऊलमध्ये 1 अंडं चांगले फेटून घ्या. हे फेटलेले अंडं पिठाच्या मिश्रणात घालून पीठ हलकेच एकत्र गोळा करा (जास्त मळू नका).

  2. क्रस्ट सेट करणे

    दोन बटर पेपरच्या मध्ये गोळा ठेवून गोल लाटून घ्या आणि 40–60 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. नंतर ते टार्ट पॅनमध्ये व्यवस्थित पसरवा, कडा नीट दाबून जास्तीचे पीठ कापून घ्या. फिलिंग तयार होईपर्यंत पॅन पुन्हा फ्रिजमध्ये ठेवा.

फ्रँजिपेन फिलिंग

  • बदामाची पूड (Almond flour)
    वजन:१०० ग्रॅम
    प्रमाण:1 कप
  • पिठीसाखर
    वजन:१०० ग्रॅम
    प्रमाण:1 कप
  • कॉर्नस्टार्च
    वजन:३० ग्रॅम
    प्रमाण:1/4 कप
  • अंडी
    वजन:१०० ग्रॅम
    प्रमाण:2 नग
  • व्हॅनिला एसेन्स
    वजन:५ ग्रॅम
    प्रमाण:1 लहान चमचा
  • मऊ बटर (Room temperature)
    वजन:१०० ग्रॅम
    प्रमाण:1/2 कप

कृती

  1. फ्रँजिपेन फिलिंग

    एका बाऊलमध्ये 100 g बदामाची पूड, 100 g पिठीसाखर आणि 30 g कॉर्नस्टार्च एकत्र करा. त्यात 2 अंडी, 1 tsp व्हॅनिला एसेन्स आणि 100 g मऊ बटर घालून मिश्रण हलके आणि क्रीमी होईपर्यंत फेटून घ्या. हे फिलिंग क्रस्टवर समान पसरवून घ्या.

टॉपिंगसाठी

  • ताजे पीच
    वजन:८०० ग्रॅम
    प्रमाण:4–5 नग
  • ब्राऊन शुगर (ऐच्छिक)
    वजन:१ ग्रॅम
    प्रमाण:चवीनुसार
  • बदामाचे काप/फ्लेक्स (ऐच्छिक)
    वजन:१ ग्रॅम
    प्रमाण:चवीनुसार

कृती

  1. टॉपिंग

    4–5 पीच (700–800 g) पातळ फोडींमध्ये कापून घ्या. या फोडी फिलिंगवर गोलाकार डिझाइनमध्ये रचून घ्या. वरून थोडी ब्राऊन शुगर आणि बदामाचे फ्लेक्स भुरभुुरवा.

  2. बेकिंग

    आधीच गरम केलेल्या (preheated) ओव्हनमध्ये 180°C (350°F) वर 40–45 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा. टार्ट पूर्णपणे गार झाल्यावर त्याचे तुकडे करा.

ॲलर्जन्स (Allergens)

  • ग्लुटेन
  • अंडी
  • दूध
  • नट्स (सुकामेवा)

उत्पादनांच्या घटकांवरून गणना केली आहे. पॅकेजिंग तपासा: उत्पादक ॲलर्जन्स घालू शकतात आणि उत्पादनांमध्ये त्यांचे अंश असू शकतात.

एकूण प्रमाण

एकूण वजन:१७३५ ग्रॅम
एकूण न्यूट्रिशन
४५१५कि.कॅलरी
७६प्रोटीन्स
२६७फॅट्स
४७५कार्ब्स
दर १०० ग्रॅममागे सरासरी न्यूट्रिशन
२६०कि.कॅलरी
४प्रोटीन्स
१५फॅट्स
२७कार्ब्स

तुम्हाला लॉग इन ठेवण्यासाठी आम्ही आवश्यक कुकीज वापरतो. तुमच्या संमतीने, भेट देणाऱ्यांची संख्या मोजण्यासाठी आम्ही ॲनालिटिक्स कुकीज (Google Analytics) देखील वापरतो. तुम्ही तुमचा निर्णय पेजच्या तळाशी असलेल्या “कुकी सेटिंग्ज” मध्ये कधीही बदलू शकता. सविस्तर माहिती आमच्या गोपनीयता धोरण (Privacy Policy).